जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका महाविद्यालयाच्या परिसरातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळवून नेल्याची घटना ५ सप्टेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी दि ६ रोजी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, ग्रामीण भागातून शहरातील एका महाविद्यालयात आलेल्या अल्पवयीन मुलगी १५ वर्ष तर दुसरी १८ वर्षाची अशा दोन बहिणींना दि ५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अनोखळी व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी जळगाव जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि राजेंद्र पवार हे करीत आहेत.