छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) एका १० वर्षीय मुलावर गल्लीतीलच दोघा नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरूध्द एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत दनके व इरफान उर्फ गोल्या जफर सय्यद, असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमांची नावे असून यातील एकास अटक करण्यात आली आहे.
१० वर्षीय पिडीत बालक हा शनिवारी (दि. १) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. परंतू बराच वेळ झाल्यामुळे पिडीत बालकाचा मोठा भाऊ आणि त्याचा मित्र पिडीत बालकाला शोधत होते. त्याचवेळी गल्लीतील एका घराजवळ पिडीत बालकाचा हा वाचवा, वाचवा म्हणून ओरडत असल्याचा आवाज शोध घेणाऱ्या भावाला आला. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन बघितले असता अनिकेत दनके व इरफान उर्फ गोल्या जफर सय्यद हे तेथे होते. तर अनिकेत अनैसर्गिक कृत्य करताना दिसले.
पिडीत बालकाच्या मोठ्या भावाला व मित्राला कोणाला सांगू नका? अशी धमकी इरफानने दिली. त्यानंतर पिडीत बालकाने घडलेला सर्व प्रकार त्याच्या आईला सांगितला. यानंतर पिडीत बालकाच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अनिकेत व इरफान सय्यद या दोघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सायंकाळी पोलिस पथकाने उद्योगनगरीत सापळा रचून इरफान सय्यद (१९) यास ताब्यात घेतले. तर अनिकेत फरार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउपनि सचिन पागोटे करीत आहे.