वरणगाव (प्रतिनिधी) शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने ६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात फैजल अश्फाक शेख ( वय २१, वरणगाव ता. भुसावळ) याच्याविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३ एप्रिल २०२२ रोजी दुपारच्या सुमारास फैजल अश्फाक शेख याने ६ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलाला तुला नवीन बॉल घेण्यासाठी २० रुपये देतो असे आमिष दाखवून आपल्या घराच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. त्यानंतर पिडीत मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गु.र.न ५६/२०२२ भादवी कलम ३७७ पोक्सो कायदा कलम ४,८ प्रमाणे फैजल अश्फाक शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी हे करीत आहेत.