जळगाव (प्रतिनिधी) हुंड्याच्या मागणी करीता मानसिक व शाररिक त्रास देवून इच्छेविरुद्ध पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी रामानंद पोलीस स्थानकात पतीसह सासऱ्यामंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता पतीच्या घरी अहमदनगर येथे असतांना हुंड्याच्या मागणी करीता पती मानसिक व शाररिक त्रास देवून शिवगाळ करत असायचा. तर सासू, नणंद आणि इतर लोकांनी देखील विवाहितेस मानसिक व शाररिक त्रास देवून शिवगाळ करून चापटबुक्याने मारहाण करून जिवे मारणच्या धमक्या दिल्या. तसेच चापट्याबुक्क्यांनी मारुन फिर्यादीच्या उजव्या कानाचा पडदा फाडला व कानाचा पडदा फाटल्याची डॉक्टरांकडुन सगळ्या उपचाराचा फाईल लपवुन ठेऊन दिले. एवढेच नव्हे तर पतीने इच्छेविरुध्द अनैसर्गिक संभोग केला व गांजपाठ केल्याचे देखील पिडीत विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. या संदर्भात रामानंद पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो उपनिरीक्षक शांताराम पाटील हे करीत आहेत.