अडावद (प्रतिनिधी) येथील चोपडा-यावल रोडवर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा हात ओढून झटका दिल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केला म्हणून अडावद पोलीस स्थानकात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि किरण दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १७ जून २०२२ रोजी सपोनि किरण दांडगे व पोलीस अंमलदार हे सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना निसार अली मंजुर अली याने सपोनि किरण दांडगे हे पोलीस गणवेशात असताना दांडगे यांचा हात ओढून शरीराला झटका दिला. याप्रकरणी अडावद पोलीस स्थानकात निसार अली मंजूर अली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.