भुसावळ (प्रतिनिधी) चाकूच्या धाकावर एकाने रोकडसह मोबाईल लांबवल्ययाची घटना शहरातील रजा टॉवरजवळ सोमवार, 9 रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात सुरज भांगे (भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आला.
महेंद्र रामनारायण यादव (21, मास्टर कॉलनी, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो भुसावळ शहरात आला होता. शहरातील रजा टॉवरजवळ संशयित सुरज भांगे (भुसावळ) याने चाकूचा धाक दाखवत महेंद्रचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 12 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून पळ काढला. महेंद्र यादवने भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून दुपारी तीन वाजता संशयित आरोपी सुरज भांगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपीला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये करीत आहे.