धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दि.प्र.धरणगाव येथे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शन नुसार प्रकट दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात सकाळी 8.00 वाजता भूपाळी आरती नंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करुन हवन करण्यात आले तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूर्तींवर जल अभिषेक करण्यात आला.
सकाळी 10.00 वाजेपर्यंत सर्व भाविकांनी नैवेद्यासाठी जेवणाचे डबे आणले होते. सर्व डब्यातील महाप्रसाद एकत्र करण्यात आले. सकाळी 10.30 वाजता महानैवद्य आरती करण्यात आली. आरती नंतर तालुक्याचे प्रमुख राकेश मकवाने यांनी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या कार्य तसेच श्री स्वामी समर्थ चरीत्र या पोथीचे निरूपण करण्यात आले. तसेच ग्राम अभियान शेतीशास्त्र आरोग्यशास्त्र वास्तुशास्त्र मूल्य संस्कार बाल संस्कार गर्भसंस्कार मानवी जीवनात येणारे समस्यांवर प्रश्न उत्तर विभागाचे कार्य इत्यादी विषयांवर अमृततुल्य असे मार्गदर्शन करण्यात आले.
दिवस भरात हजोरो भाविकांनी श्री स्वामी समर्थ चरीत्र ग्रंथांचे पाठ केले व श्री स्वामी समर्थ मंत्र जप करण्यात आला. दुपारी 12.00 वाजता सर्वांनी एकत्र महाप्रसाद घेतला व कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव तालुक्याच्या सर्व भाविक सेवेकऱ्यानी सहकार्य केले.