चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चुंचाळे येथील श्री बटुक भैरव बाबा घाट मंदिर कृष्णापुर रस्ता (जुना कवरीलाल शेठ मार्ग) मंदिर समितीतर्फे २४ डिसेंबर रविवार रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कृष्णापुर मामलदे चुंचाळे उमरटी अंमलवाडी गौर्यापाडा या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील ग्रामस्थांतर्फे मागील वर्षी जीर्णोद्धार केलेले पुरातन मंदिराच्या दुसऱ्या वर्षाच्या दत्त जयंतीच्या निमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शनिवार दि. 23 रोजी रोजी संध्याकाळी भजन संध्या कार्यक्रम आयोजित केला आहे. यावर्षी भंडाऱ्याची व्याप्ती वाढत असल्याचे कृष्णापुर येथील सरपंच गेमा शंकर बारेला यांनी सांगितले. नियोजीत कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी भजनमंडळ जागर रविवारी सकाळी महाआरती पूजाअर्चा व अकरा नंतर महाप्रसाद भोजनाचा कार्यक्रम असेल.
या कार्यक्रमास परिसरातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थितीचे आवाहन भैरवनाथ बाबा घाट मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास चोपडा येथून कृष्णापुरपर्यंत बस स्थानकावरून बस उपलब्ध होऊ शकते. पुढे कृष्णापुर पासून तीन किलोमीटर अंतर भाविकांना मंदिराचे दर्शनासाठी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी निसर्ग परिसर सहवासाचा आनंद घ्यावयाचा आहे. यासाठी मंदिरापर्यंत वाहनांना जाण्यासाठी मार्गाचे श्रमदानातून पुनर्बांधणी तरुणांनी केली आहे.