TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दूध संघ अपहार प्रकरण : एमडी मनोज लिमयेंसह इतरांवर कारवाईचा फास आवळला जाणार?

पोलीस आता करणार 'या' गोष्टींची चौकशी ; लिमयेंची होणार कसून चौकशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना आज न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी शैलेश मोरखडे यांचा पुरवणी जबाब आणि साक्षीदारांच्या जबाबावरून १२० ब सह इतर कलमं पोलिसांनी वाढवली आहेत. त्यामुळे एममडी मनोज लिमयेंसह इतरांवर कारवाईचा फास आवळला जाणार असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर येत आहे.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

संगणमताने तुप विठ्ठल रुख्मिणी एजन्सीला विकले
चौघं संशयिताना शहर पोलिसांनी सोमवारी रात्री ११ वाजता अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस तपासात काही गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. संशयित आरोपी तथा दुध संघातील तूप विभागात निखील सुरेश नेहते यांनी कोणतीही निवीदा नसताना यातील हरी पाटील यांना संचालक मंडळाचे पूर्व परवाणगी विना निवीदा काढून रेट न ठरवता गुन्हयातील आरोपी यांचे संगणमताने सदर गुन्हयातील तुप हे विठ्ठल रुख्मिणी एजन्सीला विकला आहे व त्यातुन दुध संघाचे आर्थीक नुकसान केले आहे. त्यामुळे पोलीस आता यामागे नेमकं कोण आहे?, याचा शोध घेणार आहेत.

दोन संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर
अटकेतील संशयित आरोपी हरी पाटील यांने अनिल अग्रवाल यांना देखील बी ग्रेडचे तूप हे विक्री केले असून तसेच अकोला येथील पोलिसांना पाहीजे असलेला रवि अग्रवालला विकला असल्याचे तपासातून समोर आले आहे. दोघांना खरेदी पेक्षा जास्त तूप बिग्रेडचे विक्री केल्याचे तपासातून समोर आले आहे. एवढेच नव्हे तर दोघांकडचे पैशांची देवाण-घेवाण ऑनलाईन झाली आहे. दरम्यान, पोलिसांना आता चंद्रकांत मोतीराम पाटील (रा. जळगाव) आणि रवि मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) यांच्या मागावर असल्याचे कळते.

एमडी लिमयेकडून तपासात सहकार्य नाही, ए ग्रेडचे तूप देखील विक्री !
मनोज लिमये हे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे जबाबदार अधीकारी असताना त्यांनी हरी पाटील आणि निखील नेहते यांच्यासोबत संगणमताने बिलिंग दस्ताऐवजमध्ये फेरफार, बनावटी करण करून नेहते यांच्या जामीनासाठी सहकार्य केले आहे. एवढेच नव्हे तर पोलीस तपासात त्यांनी पाहीजे तसे सहकार्य केले नाही. साक्षीदारांच्या जबाबावरुन सदर गुन्हयात जो काही 1800 कीलो तूपाचा अपहार झाला आहे, त्यात ए ग्रेडचे तूप देखील विक्री केले जात होते, अशी माहिती देखील तपासात समोर आली आहे. त्यामुळे याबाबत आता संशयित आरोपींकडून कसून चौकशी होणार आहे. तसेच हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून सुरु होता का?, याचा देखील शोध पोलीस घेणार आहेत.

अनिल अग्रवाल यांचा पोलिसांना कबुली जबाब
अटकेतील संशयित आरोपी अनिल अग्रवाल यांनी पोलिसांना कबुली जबाब दिला असून त्यात म्हटले आहे की, हरी पाटील यांच्या विठ्ठल रुख्मीनी एजन्सीकडुन जे काही बी ग्रेडचे तूप हे खरेदी केले आहे, त्यापैकी त्यांनी एकूण 1350 कीलो माल हा घेतलेला नाही. परंतु त्यांनी पैसे हे आरटीजीएस केले आहेत. परंतू यात मोठी तफावत असून हरी पाटील कडून घेतलेला बी ग्रेड तूप विक्रीचे बील अद्यापही तपासात त्यांनी सादर केले नसल्याचे कळते.

माल कोणी दिला व कोणत्या वाहनाने दिला?
जळगाव जिल्हा सहकारी संघातून हरी पाटील यांनी जो माल खरेदी केला आहे, तो माल त्यांनी रिक्षा क्र. (एम एच 19 सी डब्लू 1318) ने वाहतूक केली. तर कोला येथे पाठवलेला बी ग्रेडचे तुपाचा माल हा (एमएच 19 सीवाय 6363) या आयसर ने वाहतूक केली आहे. परंतू जळगावात अनिल अग्रवाल यांना डिलीवर झाला आहे, या बाबत कोणतेही पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. तसेच रिक्षा आणि आयशर चालकाने देखील जळगाव येथे माल दिला नाही, असे देखील तपासातून समोर आले आहे. त्यामुळे जर दोन्ही वाहन चालकांनी माल अनिल अग्रवाल यांना दिला नाही तर कोणी दिला?, कोणत्या वाहनाने दिला? याचा शोध घेण्याचे काम आता पोलीस करणार आहेत.

पोलीस आता करणार ‘या’ गोष्टींची चौकशी ; लिमयेंच्या अडचणी वाढणार !
पोलिसांनी साक्षीदारांकडून केलेल्या चौकशीतून असे समोर आले आहे की, त्यांच्या कडुन दूध संकलन करताना कमीशनची मागणी करून ती स्वीकारली गेली आहे. याबाबत एमडी मनोज लिमये यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. तसेच संशयित आरोपी हरी पाटील यांच्याकडे तूप बनवणे, तूप पॅकींग व हमालीचा असे सर्व ठेके होते. हे त्यांनाच का देण्यात आले?, ठेके देण्यामागे कोणाचा सहकार्य केले, याची माहिती एमडी लिमये यांना माहिती असल्यामुळे त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचे कळते.

 

ऑडीट रिपोर्टबाबत लिमयेंकडून समाधान कारक उत्तर नाहीच 

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ऑडीटर यांनी 2021-2022 च्या ऑडीट रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, डेअरी विभाग, मार्केटींग विभाग, पुशुखादय विभाग यांचा साठा हा संगणकीय प्रणालीत नोंदवणे आवश्यक आहे. परंतू तशी नोंद करण्यात येत नाही, असे निरीक्षण नोंद केलेले आहे. याबाबत पोलीस चौकशीत मनोज लिमये यांनी समाधान कारक उत्तर दिले नसल्याचे कळते. या नोंदी मॅन्युल पध्दतचा वापर करुन मोठया प्रमाणात इतर उत्पादनात देखील अपहार झाल्याची शक्यता असल्यामुळे मनोज लिमये यांची कसून चौकशी केली जाणार आहे.

संशयित आरोपींच्या अडचणीत वाढ, १२० ब सह इतर कलमं वाढली !

विना टेंडर व विना रेट निर्धारीत करणे संशियत आरोपीला जामीन मिळून देण्यास तसेच गुन्हा हा विना चौकशी रद्द करण्याचे कट कारस्थान कार्यकारी संचालक मनोज लिमये, सीएम पाटील व इतरांनी केले आहे. यात कटात जळगाव जिल्हा सहकारी संघाचे कर्मचारी महेंद्र केदार यांचा मोबाईलचा वापर तसेच प्रत्यक्ष त्यांचा वापर करण्यात आल्याचे पुरवणी जबाबात फिर्यादी शैलेश मोरखडे यांनी म्हटले आहे. तसेच संशयित आरोपींनी दस्ताएवजमध्ये संगणमताने फेरफार करून आरोपीला सहकार्य केले असल्याचेही म्हटले आहे. एवढेच नव्हे तर इतर साक्षीदारांनी देखील अशीच मिळती जुळती हकीकत चौकशीत सांगितली असल्यामुळे आजपर्यंत झालेल्या तपासावरून गुन्हयात भादवी कलम 467.477 [अ] 120 [ब] या कलमांची वाढ करण्यात आली आहे.

अकोल्यातून पाचवा संशयीत अटकेत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) या संशयित आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे कळते. रवी अग्रवाल याचा चॉकलेट कारखाना असल्याचे समजते. या गुन्ह्यातील चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील याच्या मदतीने रवी अग्रवाल यास अखाद्य तुप खाद्य म्हणून पुरवण्याचे काम केले जात असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

काय सांगता...मनूर खु. येथील पुलाचे निकृष्ट बांधकाम तोडायला सुरुवात ; सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना प्रत्यक्ष मिळणार वाढीव दराने मदत

October 27, 2021

खळबळजनक ! जबरी चोरी आणि खंडणी प्रकरणी तीन पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल

February 19, 2022

जिल्हाधिकार्‍यांना शहीद कोरोना योध्द्यांच्या मदतीच्या प्रस्तावाचे अधिकार ; डॉ. नि. तु. पाटील यांच्या मागणीला यश

June 6, 2021

संतापजनक : मध्यरात्री बालिकेला शेतात उचलून नेत दोन नराधमांकडून लैंगिक अत्याचार !

June 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group