TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात चार नवीन एसटी आगारांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

आढावा बैठकीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना : जिल्ह्यातील ७० अपघातग्रस्त ठिकाणी होणार उपाययोजना !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, बोदवड आणि भडगाव येथे चार नवीन बस आगारांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात राज्य परिवहन खात्याने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. ते राज्य परिवहन मंडख व परिवहन खात्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत बोलत होते. दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी आरटीओ विभागाला जिल्ह्यातील अपघातप्रवण ७० ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. तर यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सर्वतोपरी निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी या दोन्ही आढावा बैठकांमध्ये दोन्ही खात्यांची माहिती जाणून घेत, संंबंधीत अधिकार्‍यांना विविध निर्देश दिलेत.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकी घेण्यात आल्या. यातील पहिली बैठक ही राज्य परिवहन मंडळ अर्थात एस.टी. खात्याची झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्रादेशीक परिवहन अधिकारी शाम लोही, शाम लोही, विभागीय नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय अभियंता निलेश पाटील, सहायक प्रादेशीक परिवहन अधिकारी (एआरटीओ ) हेमंत सोनवणे, मोटार वाहतूक निरिक्षक सुनील गुरव, सौरव पाटील, हेमंत सोनवणे आदींचा समावेश होता. या बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील राज्य परिवहन खात्याची माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी काही महत्वाचे निर्देश दिलेत.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

यात प्रामुख्याने प्रत्येक तालुक्यात एस.टी.चे एक आगार अपेक्षित असतांना जिल्ह्यात फक्त ११ आगार असून धरणगाव, भडगाव, बोदवड आणि पारोळा येथे एस.टी. डेपो नसल्याने असुविधा होत असल्याबाबत चर्चा झाली. यावर पालकमंत्र्यांनी चारही ठिकाणी आगारांची निर्मिती करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून यासाठी स्थानिक पातळीवरून प्रस्ताव तयार करण्यात यावेत, असे निर्देश दिले. यासोबत आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पासेससाठी अडचणी होऊ नयेत म्हणून याचे कार्यालय हे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेपर्यंत उघडे रहावे असे ते म्हणाले. तर मोठ्या गावांमध्ये पासेस मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी असेही पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सांगितले. तसेच नवीन बसेसची मागणी, बस स्थानकांचे नूतनीकरण, डागडुजी आदींचे प्रस्ताव पाठविण्याचे देखील सुचविले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते श्याम लोही व जगनोर यांचा सत्कार

या बैठकीच्या प्रारंभी जिल्हा एस.टी. खात्याने राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांचा तर, महसुलात उत्तम कामगिरी करण्यासह जिल्ह्यातील अपघातांमध्ये ४० टक्के इतकी घट आल्याबद्दल एआरटीओ शाम लोही यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यंदा जानेवारी ते मे दरम्यान अपघातांची संख्या कमी झाल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी परिवहन खात्याच्या गत पाच वर्षातील महसुलाबाबत आढावा घेतला. आरटीओ विभाग-महसूल वसुलीबाबत माहिती घेतली. यात मागील चार वर्षांमध्ये जळगावच्या आरटीओ विभागाला ५७९ कोटी ४४ लक्ष रूपयांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ५२६ कोटी ९२ लक्ष रूपये म्हणजेच सुमारे ९१ टक्के महसूल वसूल झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात २०५ कोटी ९६ लक्ष उद्दीष्ट असतांना यातील २३ कोटी ८३ लक्ष वसुली करण्यात आली असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. तर कर्की येथील सीमा तपासणी नाका येथे चार वर्षात २९ कोटी ६३ लक्ष उद्दीष्ट असतांना फक्त १४ कोटी ३४ लक्ष वसुली झाली. तर, चोरवड येथील सीमा तपासणी नाक्यावर चार वर्षात ५ कोटी १० लक्ष रूपयांचे उद्दीष्ट असतांना २ कोटी ३९ लक्ष वसुली करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी होणारे अपघात हा चिंतेचा विषय असल्याने याबाबत चर्चा करण्यात आली. यात सर्व तालुक्यांमध्ये वारंवार अपघात होणार्‍या ७० ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करून अपघातांची संख्या कमी कशी करता येईल ? यावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या तीन वर्षांपेक्षा यंदा अपघातांचे प्रमाण तुलनेत कमी असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी परिवहन खात्याला आवश्यक ते निर्देश दिलेत. यात प्रामुख्याने जळगाव येथील उपप्रादेशीक परिवहन विभागाच्या कार्यालयाचा दर्जा वाढवून तो प्रादेशीक परिवहन अधिकारी असा करावा तसेच भडगाव येथे उपप्रादेशीक परिवहन कार्यालय उभारावे यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असून यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावेत असे निर्देश ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत. परिवहन विभागाच्या नवीन आकृतीबंधातील रिक्त पदांची माहिती देखील सादर करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अंमली पदार्थांची वाहतूक करणार्‍यांना आळा घालावा, केळी वाहतूक करणार्‍या वाहनांना तपासणी नाक्यावर अडवू नये, अपघातांना आळा बसून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

अखिल भारतीय साहित्य परिषदेची चोपडा तालुका कार्यकारिणी घोषित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावमध्ये बहुजन पुरोगामी संघटनांचा रास्ता रोको ; प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात !

December 13, 2022

‘कोविड १९’ ची लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने चाचणीसाठी संदर्भित करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे डॉक्टरांच्या संघटनांना आवाहन

March 23, 2021

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026

खुशखबर ! झायडस कॅडिलाच्या लशीला भारतात आपात्कालीन वापराची परवानगी

August 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group