अमळनेर (प्रतिनिधी) येथे श्री खाटू श्यामजी संकीर्तन तथा फागण महोत्सव प्रथमच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या काही वर्षात राजस्थान येथील श्री खाटू श्याम जी देवस्थानचे प्रस्थ वाढले असताना अमळनेर येथेही मोठा भक्त परिवार निर्माण झाला असून येथून नियमित अनेक जण दर्शनासाठी जात असतात सदर महोत्सव अमळनेर येथे 10 मार्च रोजी एकादशीला महाराणा प्रताप मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भजन प्रवाहक नारायण जी ओझा जळगाव याना निमंत्रित करण्यात आले होते, तसेच श्री दरबार सेवेसाठी इंदोर येथील श्री दीनानाथ नरेश सेवा परिवार उपस्थित होते. पूजन व आरती नंतर भजन गायक नारायण ओझा यांनी एकापेक्षा एक सुंदर भजन सादर करून रंगत आणली.
कार्यक्रमात समस्त श्याम प्रेमी परिवारातील गणगौर मंडळातील सदस्या नीता जोशी, अर्चना वर्मा, प्रीती साखला, माधुरी टाक, कल्पना शर्मा, अर्चना शर्मा, स्मिता शर्मा, सीमा वैष्णव, सुनीता शर्मा, मीना शर्मा, स्वाती शर्मा, शितल वर्मा, कोमल वर्मा, सुनीता सोनी, रंजना दायमा व सर्व गणगौर मंडळ सदस्यांनी उपस्थिती देऊन अथक परिश्रम घेतले. तसेच गिरीश वर्मा,कपिल दलाल,श्रीमती राजश्री वर्मा, महेश डिंगराई व विनोद अग्रवाल यांचे अनमोल सहकार्य लाभले.तसेच महाराणा प्रताप मित्र मंडळ व न्यू प्लॉट विकास मंच सदस्यांचेही सहकार्य लाभले. समस्त भक्त गणांनी महोत्सवाचा लाभ घेतला.