जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सराफा बाजारात चांदीने विक्रम मोडला आहे. गुरुवारी स्थिर असलेल्या चांदीच्या दरात शुक्रवारी अचानक तुफान वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव अडीच लाखांच्या घरात पोहोचला असून, ग्राहक चांदी खरेदीस उत्सुक झाले आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत चांदीत तब्बल 70 हजार रुपयांची वाढ झाली आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी चांदीचा दर 1,80,000 रुपये होता, तर 29 नोव्हेंबरला तो 1,74,000 रुपये होता. डिसेंबर महिन्यातील वाढीमुळे ग्राहक जुनी चांदी मोडून विक्री करण्याचा विचार करत आहेत.
विशेषज्ञांचा अंदाज आहे की, नवीन वर्षात चांदीचा भाव तीन लाखांच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बाजारातील या घोडदौडीत ग्राहक आणि व्यापारी दोघेही सावधगिरी बाळगत आहेत.
















