TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टरांच्या अक्षम्य भेदभावपूर्ण व्यवहारामुळे एकाच मृत्यू ; मुख्यमंत्र्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2021
in चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील प्रदीप पावरा यांचा ४ एप्रिलला रात्री जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना काळात डॉक्टरांच्या अक्षम्य भेदभावपूर्ण व्यवहारामुळे मृत्यू झाला. हा मेडिकल कॉलेजच्या निष्काळजीपणाचा बळी आहे, असा आरोप त्यांची पत्नी व मूले व लोकसंघर्ष मोर्चा संघटनेने केला आहे. तसेच याप्रकरणी कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्रातील “जन आंदोलनसंघर्ष समिती”ने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रदीप पावरा यांना दि. २९ मार्च २०२१ रोजी लासुर (ता. चोपडा, जि. जळगाव) प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली असता ते पॉसिटीव्ह निघाले. तरी देखील त्यांना ऍम्ब्युलन्स दिले नाही. तो आपला मुलगा व बायको बरोबर मोटार सायकलवर बसून २२ किमी प्रवास करत RH चोपडाला पोहचला तेथून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यायात रेफर केले. पण त्यांना बेड नाही सांगत रुग्णालयात घेतले नाही. ज्यावेळी बेड उपलब्ध होते. त्यावेळी ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन संपत आला होता. म्हणून मग नाईलाजाने त्यांना खाजगी दवाखान्यात भरती केले. तेथे होणारे मेडिकल बिल शक्य नव्हते म्हणून ३० मार्च रोजी जिल्हाधिकारी मार्फत त्याला GMC त दाखल केले. त्यानंतर २ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आम्हाला डॉक्टरांनी सांगितले की, याला १० दिवस तरी ICU मधून हलवता येणार नाही, तेव्हा प्रदीपला कुटुंबीय भेटले असता तो म्हणाला इथले एक डॉक्टर आणि वॉर्ड बॉय हे त्याचा खूप राग करतात “आई शपथ तुला उपचार करणार नाहीत म्हणतात” कुटुंबीयांनी ती तक्रार लगेच डीन यांच्याकडे तोंडी केली होती.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

ICU मधे एकूण ४६ पेशंट असताना रात्री १२ वाजता अचानक प्रदिप पावरा याला ICU मधून PNC वॉर्डमध्ये हलवण्यात आले. क्रिटिकल पेशंट असताना त्यांना का हलवले गेले? तेथे रात्री ते पलंगावरून खाली पडले व बराच वेळ ते त्याच अवस्थेत होते. त्यावेळी त्यांना ऑक्सीजन मिळाला नाही व त्यांची तब्येत अधिक क्रिटिकल झाली व ते अचेतन अवस्थेत गेले. ते नंतर उठलेच नाही आणि त्याचा मृत्यू झाला. सर्व वॉर्डमध्ये सीसीटीव्ही आहे. अगदी त्यांनी रेकॉर्ड रूम व एका अडगळीच्या रूमला पण कॅमेरे लावले आहेत. मात्र ICU व PNC वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत.

हा मेडिकल कॉलेजच्या निष्काळजीपणाचा बळी आहे, असा आरोप त्यांची पत्नी व मूले व लोक संघर्ष मोर्चा संघटनेने केला आहे. याबाबत स्वतंत्रपणे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्र ही पाठवण्यात आले आहे. पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यूझाल्यानंतर लोक संघर्ष मोर्च्याने मुलाच्या नावाने जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे.

प्रदीप पावरा हा आदिवासी असून त्याच्याबाबत जी भेदभावपूर्ण वागणूक व उपचाराबाबत जी हेळसांड केली गेली ती अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. या अन्याय विरुद्ध त्याच्या कुटुंबियांना न्याय हवा आहे. याबाबत आम्ही खालील मागण्या आपणाकडे करत आहोत.

१) एक निपक्षपाती समिती नेमून याची चौकशी केली जावी व त्यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.

२) हॉस्पिटल मधील ड्युटीवर असलेले डॉक्टर व वार्डबॉय यांना सस्पेंड करावे.

३) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करावी.

४) प्रदिप पावराच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी.

यात स्वत: लक्ष घालून कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्रातील “जन आंदोलन संघर्ष समिती”ने निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी निवेदन देताना बाबा आढाव, साथी गणेश देवी, न्या. बी. जे. कोळसे पाटील, आ. पिल पाटील, कॉ. अशोक ढवळे, साथी, मेधा पाटकर, राजू शेट्टी, साथी प्रतिभा शिंदे, कॉ. नामदेव गायकवाड, कॉ. सुकुमार दामले, विश्वास उडगी, संजीव साने, उल्का महाजन, अरविंद जक्का, विलास भोंगडे, किशोर ढमाले, लता भिसे, इब्राहिम खान, मानव कांबळे, सुभाष वारे, प्रकाश रेड्डी, राजू देसले, नितीन मते व सर्व महाराष्ट्रातील ८० संघटनांचे नेते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
Next Post

कोरोना रोखण्यासाठी कठोर पाऊल ऊचलावी लागतील : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुगल पे वरून रिचार्ज करताय सावधान ; खाते हॅक करत महिला न्यायाधीशाची लाखोची रक्‍कम गायब !

May 19, 2022

जिल्ह्यात रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्याचे सण व उत्सव जाहीर

January 12, 2021

अजित पवारांसोबत पाच वाजता शपथ घेता ते नैतिक अन् आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक – खडसेंचा संताप

October 22, 2020

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

June 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group