मुंबई (वृत्तसंस्था) येथील कुरार भागात भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. लहान भावाला अश्लील व्हिडिओ दाखवून बहिणीने लैगिंग संबंध ठेवले. अल्पवयीन बहिण गर्भवती राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १६ वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ पाहण्याचं व्यसन होतं. दरम्यान ती आपल्या मोबाईलवर १३ वर्षीय भावाला झोपताना अश्लील व्हिडिओ दाखवायची. त्यानंतर ती आपल्या भावावर दबाब टाकून त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायची. मागील बऱ्याच दिवसांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. संबंधित घटनेतून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. गर्भवती राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी संबंधित भावाची चौकशी केल्यानंतर संबंधित मुलगी खरं बोलत असल्याची माहिती उघड झाली. जेव्हा तो लैंगिक संबंध ठेवण्यास नकार द्यायचा, तेव्हा त्याची बहिण त्याला मारहाण करण्याची आणि घटनेची वाच्यता करण्याची धमकी द्यायची, अशी माहिती पीडित मुलाने दिली. संबंधित भाऊ आणि बहिणीचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
















