धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुका कार्यकर्ता विस्तृत बैठक आज जळगाव लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने चाळीसगाव विधानसभेचे आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती धरणगाव येथे बैठक संपन्न झाली. या कार्यकर्ता विस्तृत बैठकीत तालुक्याच्या आढावा व आगामी रचना संदर्भात तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी प्रास्ताविक पर भाषण केले.
यावेळी जिल्ह्याचे उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर वर विजय होणार असल्याचे आव्हान व विश्वास त्यांच्या मनोगतातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांनी स्मिताताई यांच्यावर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अन्याय झाला होता, हा अन्याय होऊन सुद्धा स्मिताताईंनी कधीच पक्षाची निष्ठा सोडली नाही. ताई सतत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेहमी संपर्क ठेवत होत्या. खरा निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाने आता उमेदवारी दिली असल्याचेही पाटील म्हणाले.
जळगाव लोकसभेचे निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीच्या विविध योजना व कार्यक्रमात संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या मनोगतात बोलतांना हे निवडणूक फक्त माझी नसून ही निवडणूक देशाची आहे. देशाला विकासाच्या दिशेने येण्याची आहे. परंतु ही निवडणूक घरात बसून मिळवता येणार नाही तर सर्व कार्यकर्त्यांना कामाची कामाला लागण्याची आवश्यकता आहे. निवडणूक कार्यकर्त्याच्या बळावर आपण देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी जळगाव लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून देणे गरजेचे आहे.
कार्यकर्ता हाच स्मिताताईंच्या परिवार असल्याने ताईंमध्ये बघायला मिळतो. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता हा व्यक्ती नाही तर पक्ष जपणारा असतो. पक्षाने जे जबाबदारी दिली ते पूर्ण करतो महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा आपल्या सर्वांचे नेते गिरीशभाऊ महाजन दिलेला शब्द जपणारे कार्यकर्ते असल्याने चाळीसगावचे आ. मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले. तर उत्तर महाराष्ट्रातून जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिताताई वाघ हे सर्वात जास्त मतांनी निवडून येतील, असेही ते म्हणाले.