अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात जळोद येथील शेतकरी देवराम चौधरी यांच्या शेताजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण रस्ता तयार केल्यामुळे पावसाळ्यात शेतात संपूर्ण पाणी साचत होते. यामुळे शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांनी शेतकऱ्याची समजुत काढून आत्मदहन करण्यापासून रोखले. तसेच संबंधित अधिकारी व विभागाची लवकरच मिटींग घेवू असे आश्वासन सचिन खंडारे यांनी दिले.
तालुक्यात जळोद येथील शेतकरी देवराम चौधरी यांच्या शेताजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने जळोद ते पातोंडा डांबरीकरण रस्ता तयार केला आहे. अशी तक्रार संबंधित शेतकऱ्यांची आहे. तरी या रस्त्यामुळे पावसाळ्यात शेतात संपूर्ण पाणी साचत असल्याने गेल्या ३ वर्षापासून न्याय मिळेल या अपेक्षेने त्यांनी नियमित संबंधित यंत्रणेच्या मागे लागून पाठपुरावा देखील केला पण त्याचा देखील काही फरक पडला नाही. शेवटी शेतकरी देवराम चौधरी यांनी दि. २६ जानेवारी २०२१ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांनी शेतकऱ्याची समजुत काढून आत्मदहन करण्यापासून रोखले व अमळनेर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, शरद पाटील, मेघराज महाजन यांनी संबंधित अधिकारी व विभागाची लवकरच मिटींग करून असे आश्वासन दिले.