TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! मोबाइलमध्ये मृत्यू कसा होतो पाहिलं अन् काही क्षणात मुलाने घेतला गळफास

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) मृत्यू कसा होतो हे मोबाइलमध्ये ऑनलाईन बघितले आणि नंतर त्या वेबसाइटवर जन्म तारीख टाकली, मृत्यू कधी व कसा होतो हे पाहिले आणि काही क्षणातच मोबाईलमध्ये पाहिल्याप्रमाणेच हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय-१३) रा. शिंदखेडा जि.धुळे या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता तुकारामवाडीत घडली.

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकारामवाडीतील मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. आजी काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्याने मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाइट बघितल्या व यानंतर बाथरूममध्ये जाऊन साडी बांधून गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. हर्षल हा शिंदखेडा तालुका धुरे येथील रहिवासी होता. तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमध्ये तीन ते चार महिन्यांपासून हर्षल तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. मामा दिपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. मामा कामानिमित्ताने घराबाहेर होते तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानावर गेली. दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तुकाराम वाडीतील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी मृतदेह तातडीने खासगी रुग्णालयात यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसंच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं. पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल याच्याकडे मोबाइल होता. या मोबाईलमध्ये त्याने एक वेबसाइट ओपन करून मृत्यू कधी होणार असा सर्च करत स्वतःची जन्मतारीख टाकलेली असल्याचं दिसून आलं. तसंच यानंतरही त्याने यूट्यूबसह अनेक वेबसाइट ओपन केल्याचं दिसून आलं. मोबाईलमध्ये वेबसाइट बघितल्यानंतर आजी काही वेळासाठी बाहेर जाताच हर्षलने मोबाइलमध्ये बघितल्याप्रमाणे बाथरूममध्ये जाऊन गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. मयत हर्षल याच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता व बहीण कोमल असा परिवार आहे. दिपक कुंवर यांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. तर हलाखीची परिस्थिती असल्याने हर्षलची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाहास मदत करते. एकुलत्या एक हर्षलच्या हट्टापायी तिने त्याला पैसे नसल्याने हप्त्यांवर पैसे परतफेडीच्या हिशोबाने काही दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांचा नवीन मोबाइल खरेदी करून दिला होता. मात्र मुलाचा हा नवीन मोबाइलचा हट्ट आणि हा मोबाइलच मुलाच्या मृत्यूस कारणीभूत होणार आहे याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत. मुलाकडील मोबाइल जप्त पोलिसांनी जप्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नायर हॉस्पिटलच्या ओपीडीत पाणी शिरले ; रुग्णालय प्रशासनाची उडाली दाणादाण

September 23, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 डिसेंबर 2025 !

December 19, 2025

श्री महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीतर्फे कर्मचारी सागर बडगुजर यांचा सन्मान

March 1, 2021

पुणे हादरले : दिराने मध्यरात्री आईसह दोन मुलांना खून करून जाळले ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group