पाचोरा (प्रतिनिधी) सबसिडीची रक्कम अर्जदाराचे बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात १ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या पाचोरा कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, ३२ वर्षीय तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची “राज्य कृषी यांत्रिकीकरण” (MAHDBT) योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पॉवर ट्रिलर 8HP हे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. सदरचा अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजुर झाल्याने बीसीएस पॉवर ट्रिलर 8HP हे मशीन खरेदी केले असता सदर योजने अंतर्गत मिळणारी 85,000 रुपये सबसिडीची रक्कम अर्जदाराचे बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललीतकुमार विठ्ठल देवरे (वय-32) यांनी पंचासमक्ष 1,500 रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम स्वतः ललित देवरे यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पाचोरा येथे स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.र्को.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पी.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी केली.