मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना आात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. इतरांच्या मुलांकडे बोटं दाखवताना स्वतःची मुलं काय करतात, याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. तुमचा मुलगा कोणाला फोन करतो, कुणाकडे पैसे मागतो. घरातील लोक कोणाकडून खंडणी वसूल करण्याचे काम करत आहेत. हे लोकांना माहिती आहे, असं मुश्रीफ म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्याला मलिक यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. मंत्री नवाब मलिक म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बिनबुडाचे, राजकीय हेतूने आरोप करणे, किरीट सोमय्यांची ओळख आहे. मंत्र्यांना सरकारला बदनाम करायचे कटकारस्थान रचले आहे. हे राजकीय हेतूने सरकारला बदनाम करण्यासाठी बोलतात. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यावर घरावर छापेमारी झाली होती. टॅक्स चुकवला, तर एजन्सीला कारवाई करण्याचा अधिकार आहे. इन्मक्स टॅक्स विभागाच्यावतीने छापेमारी केली. त्याला आता दोन वर्षे झालं आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणजे त्यांनी कोणताही गैरव्यवहार केला नाही, हे उघड आहे. किरीट सोमय्या यांना आता कोणी सिरियसली घेत नाही. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे उद्योग ते आता करत आहेत, असा आरोपही मलिक यांनी सोमय्यावर केला.