जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गंगापुरी येथील श्याम फकिरा ठाकरे (30) यांचा मृतदेह गेल्या आठवड्यात गारखेडे गावाजवळ आढळून आला होता. मयताच्या पत्नीने आपल्या पतीचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची तक्रार दिल्यानंतर अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, गंगापुरी येथील श्याम फकिरा ठाकरे (30) यांचा मृतदेह गेल्या आठवड्यात गारखेडे गावाजवळ आढळून आला होता. त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतू आता मयत श्याम ठाकरे यांच्या पत्नी विद्या ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ जून रोजी पतीला डबा बनवून दिला. यावेळी त्यांचेशी वाद झाल्याने गावातच आईकडे निघून गेल्या होत्या. परंतू अर्ध्या तासाने घरी परतले असता, पती घरी नव्हते. नातेवाईकांसोबत शोध घेतला मात्र आढळून आले नाही. नंतर त्यांचा मृतदेह आढळला. परंतू आपल्या पतीचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून कशाच्या तरी सहय्याने मारून टाकल्याची फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांसमोर आता मारेकऱ्याला शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.