धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनवद येथे किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या फिर्यादीत राहुल चंपालाल पाटील (वय.२९, नौकरी- आयटीबिपी) यांनी म्हटले आहे की, दि.२३ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गावात दोन दिवस पाणी न आल्यामुळे आरओचे १५ ते १६ हजार लाईट बिल का भरले नाही? याचा जाब विचारला. त्यानंतर संशयित आरोपी शशिकांत बापू पाटील, माधव गंभीर पाटील, सुरेंद्र माधव पाटील, शेखर राजेंद्र पाटील, प्रवीण काशिनाथ पाटील,सारंग प्रवीण पाटील (सर्व रा. सोनवद) यांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून राहुल पाटील यांना मारहाण केली. याप्रकरणी सहाही संशयित आरोपींविरुद्ध भादवि कलम १४३,१४७,१४९,३२३,३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेंद्र कोळी हे करीत आहेत.
दुसऱ्या फिर्यादीत शशिकांत बापू पाटील (वय-३५, रा. सोनवद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २३ मार्च रोजी दि.२३ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना मागील भांडणाच्या राहुल चंपालाल पाटील याने शिवीगाळ करून त्याच्या जवळील लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणमध्ये शशिकांत पाटील यांचा हात फ्रॅक्चर झालाय. याप्रकरणी राहुल पाटील विरुद्ध भादवि कलम ३२५,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.का. दीपक पाटील हे करीत आहेत.