नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशची राजधानी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर (mp Sadhvi Pragya Thakur) यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन करून एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. या इसमाने आपण अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल कास्करचा माणूस असल्याचं सांगितलं आहे.
भोपळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात प्रज्ञा ठाकूर यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कारसचा माणूस अल्याची ओळख सांगितल्याचे तक्रारीत म्हणटले आहे. ‘मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय असे सांगत लवकरच तुला मारले जाईल’ अशी धमकी प्रज्ञा ठाकूर यांना फोनवरुन देण्यात आली आहे. तसेच या घटनेवेळी साध्वी यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी या संभाषणाचा व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रज्ञा ठाकूर यांना आलेला धमकीचा फोन नेमका कुठून आला याबाबत माहिती मिळाली नसून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.