चाळीसगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहयोगाने आज चाळीसगाव शहरात हर घर तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. देशाच्या प्रतीक असलेल्या तिरंग्याचा गौरव साजरा करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.
रॅलीसाठी शहरातील विविध शाळांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. तालुक्यातून आलेल्या विद्यार्थी, व्यापारी वर्ग, डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व विविध सामाजिक घटकांनी देशाचा अभिमान ‘हर घर तिरंगा’ या घोषणेतून व्यक्त केला. रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणा, तिरंग्याचे फडकते झेंडे आणि देशप्रेमाचा जोश शहरभर अनुभवायला मिळाला.
या भव्य रॅलीचे नियोजन आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मंडल अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले. संयोजक धिरज पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह परिपूर्ण नियोजन करून रॅली यशस्वी केली.
रॅलीदरम्यान जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे चाळीसगाव शहराचा अभिमान अधिक उंचावला.