जामनेर (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या जामनेर शहरातून निघालेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी प्रचंड संख्येने सहभागी होत श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आश्वासन दिले.
जामनेर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता श्रीराम पाटील यांची प्रचार फेरी पक्षाच्या प्रचार कार्यालयापासून सुरू झाली. ती शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाली. गल्लीबोळात स्त्री-पुरुष मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपल्या घरातून बाहेर येत श्रीराम पाटील यांना मतदान करणार असल्याचे आश्वासन दिले. जामनेर तालुका हा श्रीराम पाटील यांची सासरवाडी आहे. जावयाला यावेळी विजयाचे गिफ्ट देऊन लोकसभेत पोहोचवणार असल्याची प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली. युवकांनी ठिकठिकाणी श्रीराम पाटील यांना अक्षरशः खांद्यावर उचलून घेत जवळपास संपूर्ण प्रचार फेरीत पायी चालू दिले नाही. ठिकठिकाणी श्रीराम पाटील यांना सुवासिनींनी ओवाळले, वृद्धांनी आशीर्वाद दिला तर युवकांनी सहभागी होत मतदान करण्याचा शब्द दिला. जामनेर तालुक्याचा पाणी प्रश्न गंभीर असून तो सोडवण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेऊ असे आश्वासन श्रीराम पाटील यांनी मतदारांना दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डी के पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत , महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, अनिलकुमार बोहरा, राजूशेठ बोहरा, पारस ललवाणी, भास्कर पाटील, राजेंद्र पाटील, मदन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवक तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, शिवसेना (उबाठा गट) तालुकाध्यक्ष ऍड ज्ञानेश्वर बोरसे, एस टी पाटील, कलीम शेख, रमेश पांढरे, मनोज महाले, प्रदीप गायके, नंदू इंगळे, प्रभू झालटे, दत्ता नेर, भास्कर पाटील, दिनू आबा, विश्वजीत पाटील, सागर कुमावत, अर्जुन पाटील, उत्तम पाटील, साबीर मिस्तरी, नाना पाटील, सचिन बोरसे, अलफाज मुल्लाजी, मूलचंद नाईक, चतुरसिंग नाईक, अभिषेक राठोड, रुपेश पाटील, किरण पाटील, आबासाहेब पाटील, श्रीराम मोके, शरद पवार, विशाल पाटील, दिलीप पाटील, पुंडलिक पाटील, जलील दादा, बबलू पाटील यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट ), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व जामनेरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.