जळगाव (प्रतिनिधी) विद्याप्रबोधिनी आणि जाॅर्जिया आणि फिलीपीन्स येथील आत्मीया एज्युकेशन या संस्थेमार्फत विदेशात डॉक्टर होऊ इच्छिणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शन आणि चर्चासत्र शिबीर आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतेच संपन्न झाले.
चर्चासत्राच्या सुरुवातीला खा. उन्मेष पाटील, आ. सुरेश भोळे, धांडे कोचिंग फाऊंडेशन चे संचालक नेमिवंत धांडे, रावेर येथील सुप्रसिध्द डॉ. संदिप पाटील, ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते आर. बी. नाना पाटील, आत्मिया एज्युकेशन चे सी.ई.ओ. चिराग वाघेला, व्हाईस प्रेसिडेंट रोहित गोकाणी, प्रसिध्द मानसतज्ञ राकिब अहमद, बॅंक ऑफ बडोदाचे डेप्युटी मॅनेजर साई नरेश, विद्याप्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
चर्चासत्राच्या सुरुवातीला नेमिवंत धांडे यांनी सद्यस्थितीतील संपूर्ण भारतातून नीट परिक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी आणि MBBS च्या उपलब्ध जागा यांचे गुणोत्तर सांगून विदेशात MBBS करण्याविषयीच्या कल्पनेबाबत अधिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विदेशात MBBS ची संधी उपलब्ध करण्यासाठी योगेश पाटील यांनी सिमोल्लंघन केल्याचे सांगितले.
आ. सुरेश भोळे आणि खा. उन्मेष पाटील यांनी आपल्या मार्गदर्शानात विदेशात MBBS याबाबत अधिक बोलतांना सांगितले कि, सर्वसाधारण परिस्थितीतील पालकांनाही कमी पैशात याव्दारे आपल्या पाल्यांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी असल्याचे सांगून केवळ पैसे कमविण्याचे साधन न समजता विद्यार्थ्यांनी डॉक्टर होऊन रुग्णसेवेतून देशसेवा करण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले. आज कोरोनासारख्या परिस्थितीत डॉक्टर हे आरोग्यदूत ठरले असून यापुढेही महत्वाची जबाबदारी नविन होणा-या डॉक्टरांना पार पाडावी लागणार असल्याचे नमूद केले.
बॅंक ऑफ बडोदा चे डेप्युटी मॅनेजर (लोन) साई नरेश यांनी बॅंक ऑफ बडोदातर्फे उपलब्ध शैक्षणिक कर्ज योजनांबाबत आणि सुविधांबाबत मार्गदर्शन केले. आत्मिया एज्युकेशन चे सी.ई.ओ. चिराग वाघेला यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, एमबीबीएसचे शिक्षण घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. विदेशात एमबीएमएस शिक्षण घेऊन डॉक्टर होणे अधिक सोपे झाले आहे. जॉर्जिया आणि फिलीपीन्स येथे MBBS बाबत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
सध्याच्या शैक्षणिक युगात शिक्षण फार मोलाचे व महाग झालेले आहे. ग्लोबलायझेशनमुळे जग हे लहानही व्हायला लागले आहे. त्यामुळे आपल्या शहरात, राज्यात, भारतातच नव्हे, तर जगातल्या कुठल्याही देशात, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तिथे जाऊन शिक्षण घेणे खूप सोपे झाले आहे. भारताच्या तुलनेत जॉर्जिया आणि फिलीपीन्स येथील शिक्षण हे चार पटीने कमी खर्चात, सुलभ, सोयीस्कर व आधुनिक मिळत आहे. येथे MBBS केल्यानंतर उपलब्ध संधी आणि उज्वल भविष्यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून व आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थी आणि त्यांचे पालकांनी या चर्चासत्राचा मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली. जॉर्जिया आणि फिलीपीन्स येथील MBBS बाबत अधिक माहितीसाठी विद्याप्रबोधिनी, सरदार वल्लभभाई पटेल हॉलसमोर, BSNL ऑफिस समोर, जिल्हापेठ, जळगाव येथे किंवा 84477 03043 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्याप्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील सर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
 
	    	
 
















