धरणगाव (प्रतिनिधी) शहर काँग्रेसतर्फे व डी.जी.पाटील यांचा प्रयत्नाने विकास लांबोळे यांनी भोई समाज पंच मढी, भोई वाडा येथे आयोजित केलेल्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. खेड्यावरील तसेच गावातील तब्बल २५० लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
प्रदेश सचिव मा.डी.जी. पाटील यांचा हस्ते लसीकरण शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळेस भोई समाजाचे अध्यक्ष सुनील जावरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष रतिलाल चौधरी, मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष फत्रू भोई, काँग्रेसचे जिल्हा सरचटणीस सम्राट परिहार, भोई समाजाचे उपाध्यक्ष जीवन भोई, खजिनदार राजेश जावरे, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, संजय निराधार समितीचे सदस्य बंटी पवार, कैलास लांबोळे, विकास लांबोळे, रामचंद्र माळी, दीपक भोई, युवक उपाध्यक्ष राहुल मराठे, राजू भोई, भरत भोई, बापू भोई, बबलू भोई, विनोद भोई, आबा भोई, पंकज भोई, बंटी भोई, चेतन भोई, आश्विन भोई, रोहन जावरे, भोला लांबोळे, जयेश जावरे, भोला भोई, समाधान भोई, राधे भोई, अमोल भोई व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच डॉ. मयूर जैन व स्टाफने लसीकरण यशस्वी होण्यासाठी प्रयंत्न केले.