मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांची सर्व तयारी पूर्ण झाली असून दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षांसदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियमावली जाहीर केली आहे.
पण पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये काही शंका निर्माण झाल्या आहेत.
१. परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक असणार का?
दहावी आणि बारावीच्या परिक्षेसाठी बसण्यासाठी लसीकरण बंधनकारक नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नाही, ते देखील परीक्षेसाठी हजर राहू शकतात. परंतु परिक्षेला बराच कालावधी असल्याने विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे.
२. परिक्षा ऑफलाइन का ऑनलाइन ?
इयत्ता १० वी आणि १२वीच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. परिक्षा देणाऱ्या बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. अशी विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देता येणार नाही. त्यामुळेच परीक्षा ऑनलाइन न होता ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत.
३. विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह असल्यास ?
इयत्ता १०वीची परीक्षा यंदा १५ मार्चपासून ते इयत्ता १२ वीची परीक्षा येत्या ४ मार्चपासून घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल.
४. परिक्षेसाठी अभ्यासक्रम कसा असणार?
कोविड १९ मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात यापूर्वीच २५ टक्क्यांनी घट करण्यात आल्यामुळे परीक्षा या ७५ टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
५ . प्रॅक्टिकल असे असणार?
प्रात्यक्षिक परीक्षा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याने त्या घेणे अनिवार्य आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसांठी ४० टक्के गुणांवर आधारीत प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत.
६ . परीक्षा केंद्रातील बैठक व्यवस्था कशी
विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा देण्याची वेळ येणार नाही. तसेच एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवलं जाणार आहे. परीक्षेला विद्यार्थी झीक झॅक पद्धतीने सुरक्षित अंतर ठेऊन बसतील असे नियोजन करण्यात आले आहे. सर्व परीक्षा केंद्रावर कोविड १९मुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान लक्षणे दिसली तर त्याला या स्वतंत्र कक्षात बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.