धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव-चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ आज पहाटे एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहेत. तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमी बस ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे बस अनियंत्रित होऊन इलेक्ट्रिक पोलला धडकल्यानंतर 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली होती. त्यानंतर आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ उभे असलेल्या एका ट्रॅक्टरला बसने मागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की एसटी बस ड्रायव्हरची केबिन पूर्णपणे चक्काचूर झाली होती.
या अपघातात एक जण ठार तर 21 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात एसटीचा ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पवन देसले आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहोचले होते त्यांनी वाहतूक सुरळीत केली.