TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील !

मुक्ताईनगर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी रोहिणी खडसे यांना जाहीर !

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2024
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येत्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा असे आवाहन करत विधानसभा निवडणुकीसाठी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची उमेदवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी जाहिर केली.

तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांना विधानपरिषद मध्ये संधी देण्यात येईल असे सांगितले. रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रचारसभा मुक्ताईनगर येथे पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी येत्या सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे असतील अशी घोषणा केली.

READ ALSO

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

यावेळी जयंत पाटिल म्हणाले मला आठवतं नाथाभाऊ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणी खडसे यांनी सांगितलं की, नाथाभाऊंना कुठे जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. काही झालं तरी मी तुमच्यासाठी काम करणार आहे. वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीने वेगळा निर्णय घेणे हे सोप्पं काम नाही. पण रोहिणीताईंनी तो निर्धार केला. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत. या विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेला आपल्या उमेदवाराला तुम्ही लीड द्याल यात शंका नाही. पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथे उभ्या राहणार आहेत. त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीन उभे राहावे लागेल, असे जयंत पाटील म्हणाले.

यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना 12 फेब्रुवारी 2022 मध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथे जयंत पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेत देखिल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रोहिणी खडसे या उमेदवार असतील अशी घोषणा केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते रोहिणी खडसे यांचा पराभव करून त्यांचे जे नुकसान मागच्या (2019च्या विधानसभा) निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल असे म्हणत विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना जाहीर केली होती.

रोहिणी खडसे यांनी 2019 मध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला होता. पराभव झाल्यानंतर पराभवाने खचून न जाता रोहिणी खडसे यांनी दुसऱ्या दिवसांपासून मतदार संघात राजकीय सामाजिक कार्य सुरू केले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपल्या मतदारसंघात शेवटच्या घटकापर्यंत जनसंपर्क करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो त्यासाठी मतदारसंघात सतत दौरे करून सर्वांच्या सुख दुःखात अडीअडचणीत त्या सहभागी होत असल्याचे दिसून येते मतदारसंघातील विद्यार्थी, तरुण, वृद्ध,अपंग निराधार, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शेतमजूर,नोकरवर्ग आदिवासी असो प्रत्येकाच्या समस्यांना, सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील या असल्याचे दिसते त्यासाठी पाठपुरावा, आंदोलन, मोर्चे काढण्याची त्यांची सदैव तयारी असते.

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील 182 गाव खेडे वस्त्यांवर काढलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा राज्यभरात लक्षवेधी ठरली या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या सार्वजनिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला तसेच पक्षाची संघटन बांधणी करून पक्षाच्या अठरा हजार सभासदांची नोंदणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद दिले. या पदाला न्याय देऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे दिसते त्यासाठी त्यांनी विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागाचे दौरे करून पक्ष संघटनेचे मेळावे नियुक्त्या करून पक्ष संघटन वाढीस चालना दिली.

एकनाथराव खडसे यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वर्धा, नागपूर, रामटेक, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून उमेदवारांचा प्रचार केला. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात असलेल्या हाय व्होल्टेज मुकाबल्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला विधानसभा क्षेत्रात कॉर्नर सभा प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला.

रावेर लोकसभा मतदारसंघात आपल्या वहिनी रक्षा खडसे यांच्या विरोधात पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारात आणि रणनीती आखण्यात रोहिणी खडसे आघाडीवर आहेत. जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे यांच्या नियोजनातच मुक्ताईनगर येथे शरद पवार यांची भव्य सभा पार पडली या सभेतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे परत एकदा उमेदवारी जाहीर केली. रोहिणी खडसे या घेत असलेली मेहनत त्यांचा जनसंपर्क व पक्षाच्या पाठबळाच्या जोरावर त्या मुक्ताईनगर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवतील अशी मुक्ताईनगर मतदारसंघात जनमानसात चर्चा सुरू झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: jayant patilMiktainagarRohini khadse

Related Posts

गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
गुन्हे

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025
जिल्हा प्रशासन

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती !

March 18, 2025
गुन्हे

मुक्ताईनगरात मुलींची छेड काढणाऱ्या चौघांना अटक !

March 4, 2025
मुक्ताईनगर

खळबळजनक! मुक्ताईनगर येथे रक्षा खडसेंच्या मुलीची छेड

March 2, 2025
गुन्हे

वन विभागाच्या गस्ती पथकावर डिंक तस्करांचा जिवघेणा हल्ला; एक संशयित ताब्यात !

February 14, 2025
Next Post

चोपडा येथे मुख्य निवडणूक निरीक्षक मीना यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ७१ कोरोनाबाधित ३७ झाले बरे ; ३ तालुके निरंक !

December 24, 2020

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने WHO चीनवर नाराज

January 6, 2021

मजूर पुरवण्याच्या नावाखाली सातारा येथील एकाची साडे सात लाखांत फसवणूक ; चोपडा पोलिसात गुन्हा !

October 13, 2022

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम : पिंप्राळा हुडकोत रॅली, जळगावात झेंडे वाटप !

August 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group