TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंजाबमधील काँग्रेसमध्ये उभी फूट, सिद्धू यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेशाध्यक्षपदी निवड करून काँग्रेसने गटबाजी शमविली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. आता सिद्धू हे आक्रमक झाले असून, त्यांनी पक्षातील ६२ आमदारांना घेऊन आज सुवर्णमंदिर गाठले. सिद्धू यांनी आज केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे पंजाबमध्ये तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध झाले आहे.

सिद्धू यांनी आज ६२ आमदारांसह सुवर्णमंदिराला भेट दिली. काँग्रेसचे एकूण ७७ आमदार असून, केवळ १५ आमदार या वेळी हजर नव्हते. यामुळे ते मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या गटातील असल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांना बढती देऊन मुख्यमंत्र्यांना शह दिल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या वरदहस्तामुळे सिद्धू यांनी पक्षातील बहुतांश आमदार आपल्याकडे वळवून घेतले आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे.

२००४मध्ये भारतीय जनता पक्षाकडून अमृतसरमधून लोकसभेची निवडणूक जिंकून सिद्धू यांनी राजकीय इनिंग सुरू केली. मात्र, महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नसल्याने २०१७मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. त्यांना मंत्रिपदही मिळाले; परंतु हवे ते स्थान मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता कायम राहिली. त्यातूनच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अमरिंदरसिंग यांच्या विरोधात आघाडी उघडली. दारू आणि ड्रग्जमाफिया यांच्या विरोधात अमरिंदरसिंग कारवाई करीत नसल्याचा आणि प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबावरची कारवाई टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमरिंदसिंग व सिद्धू वादात तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या समितीने सिद्धू यांचे पुनर्वसन करण्याची शिफारस केली; परंतु सिद्धू प्रदेशाध्यक्ष पदासाठी अडून बसले. दबाव वाढविण्यासाठी ‘आम आदमी पक्षा’त जाण्याचे संकेतही त्यांनी ट्विटद्वारे दिले. त्यामुळे अखेर प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पंजाबमध्ये काँग्रेसची पुन्हा सत्ता आल्यास ते उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा असली, तरी तळागाळात काम करणाऱ्या अमरिंदरसिंग यांचा वारसा ते चालवू शकतील का, हा प्रश्न आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

छाया साखरे “लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड”ने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत  पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

November 4, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाने ठोठवला दंड ; जाणून घ्या…नेमकं काय आहे प्रकरण !

June 20, 2023

धरणगावात गांजा विक्रीसाठी आलेल्या वृद्धाला अटक !

November 2, 2024

राष्ट्रवादी महिला काँग्रेस उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील

March 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group