धरणगाव (प्रतिनिधी) तालुका काँग्रेस कडून एरंडोल आगार प्रमुख बागुल तालुक्यातील ग्रामीण भागात बसेस सुरु करण्यात याव्या, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
कोरोना महामारी मुळे मार्च महिन्यापासून सर्व ये-जा करणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. कालांतराने एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसेस सुरु केल्या. परंतु धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात येजा करण्याऱ्या बसेस अदयाप हि सुरु करण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धरणगाव तालुक्यात जवळपास 100 खेडी आहेत. ग्रामीण भागातील लोकांना तालुक्यावर व जिल्ह्यावर ये-जा करण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी बसेस सुरु करण्यात याव्यात अशी मागणी धरणगाव तालुका काँग्रेस कडून आगार प्रमुख यांच्याकडे करण्यात आली. यावेळेस तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष चंदन पाटील, सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोळे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गौरवसिंग चव्हाण, सरचिटणीस योगेश येवले, प्रमोद जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.