जळगाव (प्रतिनिधी) जुना निमखेडी रोडवरील तात्काळ एलईडी लाईट सुरु करण्यात यावे, अशी मागणी जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील आणि कुणाल पवार यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. काम तात्काळ पुर्ण न झाल्याच संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले नुसार, शहरात एलईडी बसवण्यासाठी सात कोटीचा मक्ता देण्यात आला होता. त्याप्रमाणे शहरात काही ठिकाणी एलईडी बसवलेले परंतु त्याचा गुणवंत गुणवत्तेनुसार गुणवत्तेच्या बाबतीत शंका आहेत या योजने अंतर्गत उभे केले परंतु काहीच बॉलवर एलईडी बसवणे काही वर प्रतीक्षा सुरू आहेत त्या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक संध्याकाळ स्वच्छ हवा घेण्यासाठी फिरत असतात. परंतु अंधाराचा फायदा घेत बरेच टवाळखोर फिरतात त्याचा त्रास नागरिकांना घ्यावा करावा लागत आहे पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्याचाच भाग म्हणून निष्पाप संभाजी पाटील यांनी यांचा जीव गमवावा लागला. त्याकरिता जर स्क्रीन लाईट एलईडी सुरू राहिले असते तर टवाळखोरांना शोधण्यात मदत झाली असती व शतपावली करणाऱ्या मोकळेपणाने फिरता आले असते.
घटनेमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. म्हणून आपणास विनंती की, मग ते दारात लवकर अपूर्ण काम पूर्ण करण्याचा आदेश करावेत मक्तेदारी चार नोटीस देऊन तो काम करत नसेल तर त्याच वेळेस तात्काळ कारवाई करावी अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच जुना निमखेडी रोड वरील सर्व एलईडी बसवण्यात यावे अन्यथा नागरिकांच्या गैरसोयी जबाबदार असणाऱ्या कर्मचारी अधिकारी मुख्य दारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अभिनव आंदोलन केले जाईल या पूर्णपणे मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.