भुसावळ (प्रतिनिधी) सध्या महागाईने त्रस्त झालेल्या प्रवासी जनतेला दिलासा देण्यासाठी बुऱ्हाणपूर रावेर सारख्या भागातून मेमु ट्रेन्सचे जादा फेऱ्यां प्सेंजर गाड्या सुरू करून सवलतीचे दरातील मासिक पास लवकर सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते प्रशांत बोरकर यांनी मद्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
अनेक नोकरदार हे तीन चार हजार रुपये महिन्यावर जळगाव भुसावळ येथील अनेक छोटे मोठे दुकाने उद्योग मद्ये काम करत होते. परतू रेल्वे गाड्या बंद झालाय. पासेस् बंद झाल्यामुळे उपडाऊन परवडत नसल्याने त्रासलेले लोकांनी नोकऱ्या सोडून दिल्या असून बेरोजगार झाले आहेत. एस्टी बंद आहे तसेच खाजगी वाहतुकीचे भाडे रोजचे दोन तीनशे परवडत नाही. पगार तीन चार हजार आणि येण्या जाण्याचे भाडे सहा हजार होते. पेट्रोल डिझेल पण महाग झाले म्हणून गेले दोन वेशापासून शेकडो कामगार तसेच विद्यार्थी यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. जादा मेंमु ट्रेनचे फेऱ्या सुरू केल्या तर गर्दी पण कमी होइल आणि रस्त्यावरील वाहतूक कमी होवून अपघात कमी होतील आणि जनतेला सुरक्षित आणि स्वस्त प्रवास दिलासा मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवासी मित्र प्रशांत बोरकर यांनी केंद्र सरकार रेल्वे प्रशासनकडे आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडे केली आहे.