जळगाव प्रतिनिधी । शहरातील सफाई ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीच्या अंतर्गत जवळपास रोज 400 कामगार 490 रु प्रमाणे काम करत असून ती रक्कम महानगरपालिका वॉटर ग्रेसला अदा करत आहे. परंतु वॉटरग्रेस कंपनी त्या कर्मचारी वर्गाचा EPF तसेच ESIC तुटपुंज्या रकमेचा भरत आहे. या संबंधी विविध कर्मचारी वर्गाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून वॉटर ग्रेस कंपनीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (महानगर) अभिषेक पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जळगाव महानगरपालिकेच्या अंतर्गतच्या सफाई ठेका हा वॉटर ग्रेस या कंपनीस पुढील 2023 पर्यंत प्राप्त झालेला आहे. सदरील ठेकेदार त्या च्या अंतर्गत काम करत असलेले जवळ पास ४०० सफाई कर्मचापाना रोजी ने पैसे देत असतो. परंतु सदरीश ठेकेदार महानगरपालीकटून ४२०+५४ रु.(ST)अशे ५३४ रु प्रमाणे पैसे अदा करत आहे. त्या संबधीत एक बिलही लावण्यात आलेले आहे. तसेच या सर्व कर्मवायाये (PF) भरते आहेत कि नाही हे अद्याप कर्मचार्याना समजू शकत नाही आहे. तसेच येथे काम करणाऱ्या भरपूर कर्मचारी यांच्या माझ्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तरी आपणास विनंती आहे सदरील ठकेदारीची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व दोधी अदव्यास योग्य ती कठक कार्यवाही करून दंड वसूल करण्यात यावा ही विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.