भुसावळ (प्रतिनिधी) तालक्यातील खडका भागामध्ये रस्ते, नाल्या, शुध्द पाणी, पथदिवे आदि अनेक समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तर्फे ग्रामसेवक यांना देण्यात आले.
तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत येणार्या निधीतून सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्यासाठी नाल्या तयार करण्यात आलेल्या नाही. कोणत्याही प्रकारची साफसफाई केली जात नाही . पिण्याचा पाणीपुरवठा नियमित होत नाही. सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पाण्याची दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी वंदनाताई सोनवणे, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी जिल्हा महासचिव आणि संगिता भामरे, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली. या समस्या लवकरात लवकर लक्ष देऊन सोडविण्यात याव्यात अन्यथा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच याप्रसंगी विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, दिनेशभाऊ इखारे जिल्हा महासचिव यांची देखील उपस्थिती होती.