भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ नगरपालिका हद्दीतील सिंधी कॉलनी, अशोक नगर, दीनदयाल नगर परिसरात डेंगूची कीटकनाशक धूर फवारणी करण्यात यावी, असे निवेदन स्वराज्य पोलीस मित्र, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना भारत सरकार नोंदणी कृतचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र वानखेडे आणि भुसावळ शहर सचिव मिलिंद, रामचंद्र सोनवणे यांच्यातर्फे भुसावळ मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
भुसावळ नगरपालिका हद्दीतील सिंधी कॉलनी, अशोक नगर, दीनदयाल नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी चंद्रकांत येवले यांना फोन करून सांगितले असता त्यांनी राजेंद्र वानखेडे यांना म्हटले की, ३ दिवस अगोदरच फवारणी केली आहे. रोजच पेशन्ट सापडतील तर रोजच फवारणी करणार का? या संबधित तक्रार सुद्धा राजेंद्र वानखेडे यांनी नगरपालिकेस दिलेली आहे.