जळगाव (प्रतिनिधी) जळगाव मनपासमोर असलेल्या दुभाजकावर दुचाकी आदळल्याने एका या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. मिलिंद सोमनाथ पवार (वय ४६, रा. शाहूनगर), असे मयताचे नाव आहे.
मिलिंद पवार हे गोविंदा रिक्षा स्टॉपवरील जे.के. पान सेंटरवर कामाला होते. सोनार हे आठ वाजेच्या सुमारास टॉवरकडून नेहरू पुतळ्याकडे दुचाकीने (क्र. एमएच १९-१९४६) जात होते. यावेळी रस्त्यावर वाहनांची खूप गर्दी होती. त्यामुळे ते उजव्या बाजूने पुढे जायला निघाले. याचेवली पाठीमागून गर्दीतील आलेल्या दुचाकीस्वारामुळे ते दुभाजकाच्या अधिक जवळ गेले. त्यात त्यांची दुचाकी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेल्या दुभाजकातील महावितरणच्या मेन लाइन डायव्हर्ट व बंद करण्यासाठी लावलेल्या दुभाजकापासून दीड ते दोन फुटावर असलेल्या एबी स्वीचच्या इंण्डलवर आदळले. त्यात त्यांची मान अडकून ते खाली पडले. त्यांच्या मानेतून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि ते जागीच ठार झाले.