TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

महाराष्ट्राचा यूएईवर १० गडी राखून दणदणीत विजय

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेला सोमवारी सुरुवात झाली होती. स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या संघाने गाजवला. पहिल्या दिवशी मिळालेल्या विजयाची मालिका महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली. महाराष्ट्राने मंगळवारी झालेल्या सामन्यात यूएईच्या संघावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यामुळे उपांत्यफेरीत पोहचण्याचा महाराष्ट्राचा दावा अधिक प्रबळ झालेला आहे.
सीआयएससी स्पर्धेतील दुसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. दुपारच्या सत्रात महाराष्ट्र आणि यूएई यांच्यात लढत होती. या लढतीची नाणेफेक सौ.ज्योती अशोक जैन यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे, प्रशिक्षक तन्वीर अहमद आणि क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी आंध्र प्रदेश आणि यूएई सामन्यात नाबाद ६३ धावांची खेळी करणाऱ्या शंतून याचा सौ.ज्योती जैन यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत यूएईला प्रथम फलंदाजी दिली. महाराष्ट्राचा गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत यूएईचा फलंदाजांना जखडून ठेवले. यूएईचा संघ १५ षटकांत ८ गडी गमवात ७७ धावाच करु शकला. महाराष्ट्राकडून अनुग्रह डोंगरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तनिष जैन याने एक आणि समकित मुथा याने दोन गडी बाद केले. ७८ धावांचे सोपे आव्हान घेऊन मैदानात उतरलेले महाराष्ट्राच्या दोन्ही सलामीवीरांनी जोरदार फटकेबाजी केली. शारव शहा याने २४ चेंडूत ३१ तर आदर्श गव्हाणे याने २४ चेंडूत ४१ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी ७.४ षटकांत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.
मंगळवारी सकाळच्या सत्रात पहिला साखळी सामना बिहार- झारखंड विरुद्ध तामिळनाडू-पाँडेचरी यांच्यात झाला. त्यात बिहारच्या संघाने १३.५ षटकांत केवळ ६८ धावा केल्या. तामिळनाडू संघाने ६९ धावांचे आव्हान ९.४ षटकांत चार गडी गमावत पूर्ण केले. सहा गडीने तामिळनाडू संघाचा विजय झाला. उत्तराखंड विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यांत उत्तराखंडने १६ धावांनी विजय मिळवला. उत्तराखंडने १५ षटकांत ८ गडी गमावत ९३ धावा केल्या होत्या. परंतु आंध्र प्रदेशचा संपूर्ण संघ ७७ धावांवर १३.५ षटकांत गारद झाला. नार्थ वेस्ट आणि ओडिशा दरम्यान झालेला सामना चुरशीचा ठरला. नार्थ वेस्टने निर्धारित १५ षटकांत ११९ धावा काढल्या होत्या. उत्तरादाखल ओडिशाच्या संघाने १५ षटकांत ५ गडी गमावत ११० धावा केल्या. यामुळे नार्थ वेस्टचा संघ ९ धावांनी विजेता ठरला. नार्थ इंडिया आणि कर्नाटक-गोवा यांच्यातील लढत रोमहर्षक ठरली. या लढतीत नार्थ इंडियाच्या संघाने २ धावांनी विजय मिळवला. नार्थ इंडियाने प्रथम फलंदाजी करत ११४ धावा केल्या होत्या. कर्नाटक संघाने सहा गडी गमावत ११२ धावा केल्या. त्यामुळे नार्थ इंडियाचा दोन धावांनी निसटता विजय झाला. मध्य प्रदेश आणि तामिळनाडू यांच्यात झालेल्या लढतीत तामिळनाडूने एकतर्फी विजय मिळवला. तामिळनाडूच्या भेदक गोलंदजांसमोर मध्य प्रदेशाचा संपूर्ण संघ केवळ २३ धावांवर बाद झाला. २४ धावांचे आव्हान तामिळनाडूने केवळ १.२ षटकांत पूर्ण केले. हा सामना एकतर्फीच ठरला. यूएई आणि आंध्र प्रदेश- तेलंगणा यांच्यातील सामन्यात आंध्र प्रदेशने आठ गडी राखत विजय मिळवला. यूएईने १०५ धावा केल्या होत्या. आंध्र प्रदेशने १० षटकांत १०६ धावांचे लक्ष्य पूर्ण करत विजयाची मोहर उमटवली.
पश्चिम बंगाल आणि नार्थ वेस्ट यांच्यातील सामन्यात पश्चिम बंगालने ३३ धावांनी विजय मिळवला. पश्चिम बंगालने दिलेले १३४ धावांचे आव्हान नार्थ वेस्ट पेलू शकला नाही. त्यांचा संघ निर्धारित १५ षटकांत केवळ ८७ धावाच करु शकला. बिहार आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना मध्य प्रदेशने चार गडीने जिंकला. बिहारने १४ षटकांत १० गडी गमावत १०४ धावा केल्या होत्या. मध्य प्रदेशने १४.२ षटकांत सहा गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. नार्थ इंडिया आणि केरळ यांच्यातील लढतीत केरळचा विजय झाला. नार्थ इंडियाने निर्धारित १५ षटकांत १०२ धावा केल्या होत्या. केरळच्या संघाने १४.२ षटकांत हे आव्हान पूर्ण केले.
बुधवारी उपांत्यफेरीच्या लढती
सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत उपांत्यफेरीच्या लढती बुधवारी होणार आहे. अ गटातील सर्वाधिक गुण मिळवणार संघ ड गटातील प्रथम स्थानी असणाऱ्या संघासोबत खेळणार आहे. तसेच ब आणि क गटातून प्रथम स्थानावर असलेल्या संघात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. त्यानंतर गुरुवारी निर्णायक सामना खेळला जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
Next Post

वीज यंत्रणेचे ‘एआय’ आधारित डिजिटायझेशन; महावितरण व ‘जीईएपीपी’मध्ये सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत ; पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती !

July 29, 2024

यूपीमध्ये भाजपला मोठा धक्का ; कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांचा सपामध्ये प्रवेश

January 11, 2022

सरकारचं कोरोनावर की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ? : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे

March 16, 2021

व्यापारी बांधवांचा विचार करून निर्णयाची अंमलबजावणी करावी !

May 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group