TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम उत्साहात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा(प्रतिनिधी)  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र व मानसशास्त्र विभाग यांच्यातर्फे ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व कै.मा.ना.अक्कासो.सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कल्याणी पाटील व अंजली धीवर या विद्यार्थिनींनी सुरेल स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील म्हणाले की, ‘क्रांतिकारी स्त्रियांच्या उज्वल इतिहासाला व त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा, समाज सुधारक स्त्रियांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच त्यांच्या चरित्रातून प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे’. या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक उपप्राचार्य श्री.एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, रजिस्ट्रार श्री.डी. एम.पाटील, सौ.एम.टी.शिंदे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील, श्री.एस.बी.देवरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी भैरवी पाटील हिने राजमाता जिजाऊ, अश्विनी बाविस्कर हिने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, प्रेरणा कन्हैये हिने सावित्रीबाई फुले, प्रेरणा बडगुजर हिने कै. मा.ना.अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री,महाराष्ट्र राज्य), सारिका माळी हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई, कांचन सुरेश पाटील हिने ताराबाई शिंदे, वैष्णवी पाटील हिने आनंदीबाई जोशी, माया धनगर हिने कवयित्री बहिणाबाई चौधरी, शुभांगी बाविस्कर हिने रमाबाई आंबेडकर, विजया सपकाळे हिने सिंधुताई सपकाळ, प्रियंका पावरा हिने इंदिरा गांधी, वैष्णवी धनगर हिने कल्पना चावला इत्यादी विद्यार्थ्यीनींनी समाज सुधारक व क्रांतिकारी स्त्रीयांच्या भूमिकेतून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला तसेच भावी पिढीला मोलाचा संदेश दिला.
याप्रसंगी डी.एस.एम हा कोर्स पूर्ण केल्याबद्दल श्री.एस.टी. शिंदे, श्री.एस.बी. देवरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे म्हणाले की, ‘चरित्र वाचनातून महान विचारांचा परिचय होतो. तसेच समाज सुधारण्याची प्रेरणा मिळते. अडीअडचणींवर मात करून तेजस्वी जीवन जगण्याची कला समाज सुधारकांच्या चरित्रातून शिकायला मिळते. महान व्यक्तींच्या चरित्राचे वाचन करावे व त्यांच्या विचारांचे अनुकरण करून उत्तम जीवन जगावे’. यावेळी त्यांनी क्रांतिकारी व समाजसुधारक स्रियांच्या भूमिकेद्वारे कार्याचा परिचय करून देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.माहेश्वरी धनगर हिने केले तर आभार श्री.एस.बी. देवरे यांनी मानले
या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : दूध संघातील लोणी, दूध भुकटी चोरी प्रकरण ; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळातील धाडसी घरफोडी ; 50 हजारांचा ऐवज लंपास !

August 31, 2023

नांदेडमधील एसटी कंडक्टरची बसमध्येच आत्महत्या

February 26, 2021

अमळनेरच्या विहिरीत सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह !

August 18, 2023

एलसीबी निरीक्षक बकाले निलंबित ; जाणून…घ्या…महानिरीक्षकांनी आदेशात नेमकं काय म्हटलंय !

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group