जळगाव (प्रतिनिधी) राज्यात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून नवीन आदेश जारी करण्यात आले असून २२ एप्रिल म्हणजे आज रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत.
या नियमांच्या अंतर्गत सक्तीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याच्या अंतर्गत आता राज्य शासनाच्या ऑफिसेसमध्ये फक्त १५ टक्के कर्मचारीच राहणार आहेत. यामध्ये वैद्यकीय, आरोग्य आणि अन्य अत्यावश्यक खात्यांना वगळण्यात आलेले आहेत. तर अन्य खासगी आपत्कालीन सेवांमध्येही फक्त ५० टक्के कर्मचारी संख्येनेच काम करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
ब्रेक दि चेन चे निर्बंध झाले अधिक कडक
– शासकीय कार्यालयात राहणार फक्त १५% कर्मचारी उपस्थित.
– लग्न समारंभ २५ व्यक्तींच्या उपस्थितीत उरकवा लागणार अवघ्या दोन तासांत. अन्यथा होणार ५० हजाराचा दंड.
– खाजगी वाहनातून प्रवासासही राहणार निर्बंध. नियमांचे उल्लंघन झाल्यास होणार १० हजाराचा दंड.