जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीतर्फे ओवेसी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तसेच कीर्तनकार बंडा तात्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या लेखी निवेदनात दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या त्या अशा की,
१) उत्तर प्रदेश राज्यात निवडणूक प्रचार सभा आटपुन लोकसभेचे खासदार व एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असोदोद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार करून हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून, आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी व खासदार ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
२) कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलां बाबत जे वक्तव्य केले ते निषेधार्थ असून त्यांनी आमच्या महिला खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दारू संबंधी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
तसेच यापुढे कोणीही महिलांची बदनामी करणार नाही तसेच भ्याड हल्ला होणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे
सदर निवेदनावर जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, सचिव अज़ीज शेख, उपाध्यक्ष सय्यद चाँद, खजिनदार ताहेर शेख, संचालक मोहसीन शेख, इक्बाल वजीर, अल्ताफ शेख, जुलकरनैन, हारून महबूब, सलीम मोहम्मद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदर निवेदन उपजिल्हाधिकारी महसूल शुभांगी भारदे यांना सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, वैभव सपकाळे, पी ठाकरे, मोहसिन शेख व फारूक शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
















