TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंढरपूर वारी बंद करणाऱ्या शासनाचा सर्वधर्मीय संतांकडून तीव्र शब्दात निषेध !

फैजपूर येथे १७ जुलैला तहसीलसमोर भजन आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पंढरपूर वारी बंद करणाऱ्या शासनाचा सर्वधर्मीय संतांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. दि. १७ जुलै रोजी सर्व तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय खजिनदार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पंढरपूर वारीची शेकडो वर्षापासूनची परंपरा खंडित करण्याचा घाट सत्तारूढ शासनाने घेतला असून शिस्तप्रिय असलेल्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ ह भ प बंडातात्या महाराज यांना शासनाने अटक करून स्थानबद्धतेची केलेली कारवाई, वारकरी संप्रदायाच्या पताका, ध्वज जप्त करून त्यांचा गणवेश बदलण्याची दिलेली तंबी यासह अनेक बंधन लागली जात आहे. हे निषेधार्ह असून महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी बाब असल्याने याचा अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय सनातन सत्पंथ, स्वामीनारायण पंथ, महानुभाव पंथ, दिगंबर महाराज संस्थान, वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून दिनांक १७ जुलै रोजी सर्व तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करणार आहे. असे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय खजिनदार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

आज दुपारी दोन वाजता सतपंथ मंदिर संस्थान या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समिती कोषाध्यक्ष मंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, अखिल भारतीय संत समिती सदस्य तथा खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज, महानुभाव पंथाचे सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामीनारायण गुरुकुल संस्थांचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दासजी, दिगंबर महाराज संस्थान अंजाळे येथील ह भ प धनराज महाराज, ह-भ-प नरेंद्र नारखेडे, विश्व हिंदू परिषदेचे कायम कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी, विश्व हिंदू परिषदेचे नारायण घोडके, विनोद उबाळे, भुसावळ जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, एडवोकेट कालिदास ठाकूर, बजरंग दल शहराध्यक्ष लोकेश कोल्हे यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या महाभयंकर लाटेत पंढरपूर पोटनिवडणूक झाली. यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांसह हजारो लोकांची गर्दी तेथे होती. मात्र, त्यावेळी शासनाने कोणतेही बंधन घातले नाही. आज देशात सर्वत्र जन जीवन सामान्य होत असून हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रासपणे सुरू असताना शेकडो वर्षापासूनची, लाखो शिस्तप्रिय वारकऱ्यांची पांडुरंगाची पंढरपूर पायी वारीची प्रथा शासन बंद करीत असून याचा आम्ही सर्व संत जाहीर निषेध करतो. हा फक्त वारकरी संप्रदाय यावरच नाही तर अखंड हिंदू धर्मावर आघात आहे असे सर्व संतांचे मत आहे, असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

स्वामीनारायण संस्थांचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दासजी यांनी शासनाचा निषेध करून हिंदूंचे श्रद्धा स्थान असलेले पांडुरंग अठ्ठावीस युगापासून महाराष्ट्र भूमी उभे आहे. युगानुयुगापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पायी दिंडी खंडित करणे हे भविष्यासाठी घातक ठरेल. याचे भविष्यात दुष्परिणाम भोगावे लागतील याला कोण जबाबदार राहणार ? असा प्रश्न उपस्थित करून ‘वारी बंद मात्र बाकी सर्व चालू’ या शासनाच्या अजब कारभाराचा निषेध व्यक्त केला.

खंडोबा देवस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समिती सदस्य महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज यांनी शासनाच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करून देशात सर्वदूर निवडणुका, स्वागत, सत्कार, आदी कार्यक्रम होत असून महाराष्ट्र सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना पांडुरंग सदबुद्धी देवो अशी प्रार्थना केली. तर महानुभाव पंथाचे सुरेश शास्त्री मानेकर बाबा यांनी शासनाने काही बंधने घालून वारीला परवानगी द्यावी, अन्यथा याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. मोगल साम्राज्यात वारी बंद करण्याचा पहिला प्रयत्न औरंगजेबाने केला होता आणि आता हाच प्रयत्न महाराष्ट्र शासन करीत आहे. हा संपूर्ण हिंदूंचा अपमान असून समस्त संत गण यामुळे दुःखी झाले आहेत. पांडुरंगाची पंढरपूर वारी बंद करून समस्त वारकरी संप्रदायावर शासनाने हा हल्ला केलेला असल्याचे मत ह भ प धनराज महाराज यांनी व्यक्त करून शासनाचा निषेध केला.

दिगंबर महाराज मठ पंढरपूरचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी वारकऱ्यांवर शासनाने वारी बंद करून अपमान केला आहे. गेल्या एकादशीला १८० वारकऱ्यांना २००० पोलीस बंदोबस्तासाठी देण्यात आले. इतिहासात असे पहिल्यांदा घडले. ज्याच्या हाती टाळ मृदंग त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दोन हजार पोलीस बंदोबस्त. उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणण्याची वेळ आली आहे. आम्ही वारकरी याचा निषेध करतो. सर्व धर्माच्या संतांनी शासनाचा निषेध व्यक्त करून येत्या १७ जुलैला शांततेच्या मार्गाने भजन आंदोलन करण्याचे ठरविले आहे. शासनाने या आंदोलनाआधीच वारकऱ्यांच्या तसेच महाराष्ट्रातील तमाम हिंदुंच्या श्रद्धेचा भाग असलेल्या वारीला परवानगी देऊन मार्ग काढावा, असे आवाहन उपस्थित संतांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

... पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १७ जुलै २०२३ !

July 17, 2023

ग्रामीण भागाच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले : ना. गुलाबराव पाटील !

April 3, 2023

नारायण राणे यांच्या खासदारकीला राऊत यांचे उच्च न्यायालयात आव्हान !

July 14, 2024

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

July 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group