जळगाव (प्रतिनिधी) : व्हिडिओ कॉलद्वारे १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा विवस्त्र व्हिडिओ करून ब्लॅकमेल करीत त्याच्याकडून ५ लाख ९५ हजार ४५० रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार ५ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव येथील १९ वर्षीय तरुण नाशिक येथे बीसीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ५ सप्टेंबर रोजी तो फेसबुक पाहत असताना त्याने ‘ऑनलाईन मुलींशी बोलण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करा’ अशा मेसेजला क्लिक केले. त्यानंतर एक अॅप ओपन झाले व त्यात मुलींच्या नावाचे वेगवेगळे खाते दिसले.
घाबरून मुलाने पाठवले ६ लाख
यापासून वाचायचे असल्यास व्हिडिओ डिलिट करण्यासाठी डिलीट कार्ड लागेल व त्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार घाबरून सदर विद्यार्थ्याने समोरील व्यक्तीने पाठविलेल्या पेमेंट लिकवर वेळोवेळी एकूण
५ लाख ९५ हजार ४५० रुपये पाठविले. घरी प्रकार सांगितल्यानंतर गुन्हा
फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे चाळीसगाव येथे छोटेसे दुकान आहे. त्यांच्याच बँक खात्यातील रक्कम या विद्यार्थ्याने पाठविली. काही दिवसांनी हा प्रकार त्याने घरी सांगितला. या विषयीसायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली व फसवणूक करणारी महिला तोतया पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराड करीत आहेत.















