रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण भागातून रावेर शहरात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या साडेबारा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा १६ डिसेंबर रोजी रावेर बसस्थानकातील सफाई कामगार तुलसीदास करोसिया याने विनयभंग केला. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल होत संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
रावेरच्या शाळेतून संबंधित विद्यार्थिनी गावी जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती. या वेळी सफाई कामगार तुळशीदास गणेश करोसिया (रा. रामदेवबाबा नगर, सावदा) याने विद्यार्थिनीसमोर असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीने पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तुलसीदासला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपाली पाटील करत आहेत.