जळगाव (प्रतिनिधी) शहरात मुख्य रस्त्यावर महिलांकरीता स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे महिला वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शहराची गरज बघता मराठी प्रतिष्ठान व सुबोनियो केमिकल्स लि. याबाबत पुढाकार घेत असुन जळगांव शहरातील मुख्य रस्त्यावर सुसज्ज पाच “महिला पिंक टॉयलेट” स्वखर्चाने बनवुन देण्याचा प्रस्ताव आज महापालिका प्रशासनाला देण्यात आला.
महानगरपालीका प्रशासनाने या करीता योग्य जागा, पाणी व विजेची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) प्रोजेक्ट अंतर्गत महानगरपालीका प्रशासन, सुबोनियो केमिकल्स लि. व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त नावाने पिंक टॉयलेट प्रकल्प शहरात राबविला जाईल.
पिंक टॉयलेट च्या दैनंदिन स्वच्छतेंकरीता महानगरपालीकेने दररोज स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा आहे. पिंक टॉयलेटची देखभाल मराठी प्रतिष्ठान व सुबोनियो केमिकल लि. संयुक्तपणे करतील. महाबळ पासुन रेल्वे स्टेशनपर्यंत पिंक टॉयलेट बनविण्याकरीता महानगरपालीकेने जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर विद्या गायकवाड यांना देण्यात आले.
याप्रसंगी सुबोनियो केमिकल लिमिटेड चे संचालक सुबोध कुमार चौधरी, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी महिला पिंक टॉयलेट प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासनाला सविस्तर माहिती दिली.सविस्तर माहिती दिली. मराठी प्रतिष्ठान व सुबोनियो केमिकल लिमिटेड जळगाव शहरामध्ये समाज उपयोगी विविध उपक्रम गेल्या अनेक वर्षात राबवत असून पिंक टॉयलेट हा अभिनव उपक्रम राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली आहे.
















