TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावकारे कार ट्रान्सफर प्रकरण : न्यायालयाने तिघांना सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी !

जाणून घ्या.. पोलीस चौकशीत कार ट्रान्सफर होण्याबाबत काय माहिती आलीय समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आमदार संजय सावकारे (Sanjay Saavkare) यांची कार परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या नावावर परस्पर ट्रान्सफर (Transfer) केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आरटीओतील तीन एजंटांना सोमवारी अटक केली होती. अशोक विठ्ठल पाटील (जळगाव), प्रशांत उर्फ पप्पू भोळे व अकील शेख रहेमान शेख (रा. भुसावळ) या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच कनिष्ठ लेखा परिक्षक जवाहरलाल भानुदास कुलकर्णी, कनिष्ठ लिपिक गणेश देवरे, सुनील उर्फ संदीप पाटील व मनोज पाटील यांना दोषी ठरवून परिवहन आयुक्तांनी निलंबित केले होते. कार ट्रान्सफर करताना ज्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी गेला होता. तो क्रमांक अशोक पाटील यांचा होता तर पप्पू भोळे याने या मोबाईलचा वापर केला होता. अकील शेख रहेमान शेख याने पैसे ट्रान्स्फर केले होते असे तपासात निष्पन्न झाले आहे.

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

अशी केली कार ट्रान्सफर

याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे, अज्ञात इसमाने दि. २१ डिसेंबर २०२१ ते दि. २७ डिसेंबर २०२१ दरम्यान परिवहन विभागाचे www.parivahan.gov.in या पोर्टलद्वारे परिवहन वुड्स मेहरूण विभागाचे डेटाबेसमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करुन आमदार संजय सावकारे यांचे मालकीचे टोयटा कंपनीचे इनोव्हा वाहन क्रमांक MH19 CZ5130 याचेशी लिंक असलेला मो.क्रं. 9325252211 हा बदलुन तो मो.क्रं.- 7798217776 असा केला व त्यानंतर सदर वाहन हे अनिल दत्तात्रय परब यांचे नावे करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला व सदर ऑनलाईन अर्जाचे प्रिंटआऊटवर विक्रेता म्हणुन आमदार संजय सावकारे यांची व खरेदीदार म्हणून अनिल दत्तात्रय परब यांची बनावट सही करुन सदर बनावट कागदपत्रे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे सादर करून सदर वाहन हे अनिल दत्तात्रय परब यांचे नावे हस्तांतरीत करुन संजय सावकारे व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींचा असा घेतला शोध

या गुन्हयाचे तपासात जळगाव पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी व अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आवश्यक माहीती संबधीत बँकेशी पत्रव्यवहार करून प्राप्त माहीतीचे बारकाईने विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी व त्यांचा ठावठिकाणा निष्पन्न केला. गुन्हयाचे तपासकामी व आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेकामी सहा पोलीस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांच्यासोबत सफो/ बाळकृष्ण पाटील, पोहेकॉ राजेश चौधरी, पोहेकॉ/ प्रविण वाघ, पोना/ दिलीप चिंचोले, पोना/सचिन सोनवणे, पोना/संदीप नन्नवरे, पोकॉ अरविंद वानखेडे, पोकों/पंकज वराडे यांचे पथक तयार करून त्यांना जळगाव आरटीओ कार्यालय परीसर येथे रवाना करण्यात आले होते.

सापळा रचून तीन एजंटांना अटक

तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीतासाठी आरटीओ कार्यालयच्या परीसरात संबधीत पोलीस पथकाने सापळा रचुन आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेतले. या आरोपींकडून वेगवेगळया कंपनीचे ०३ मोबाईल व गुन्ह्यासंबधीत कागदपत्रे हस्तगत करण्यात आले आहे. या आरोपीना आज न्यायालयात हजर केले असता गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने २ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Sanjay_Savkare

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

खा. उन्मेष पाटलांचा आक्षेपार्ह उल्लेख करणाऱ्यांवर कडक कारवाई करा ; धरणगाव भाजपची पोलिसांकडे तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर !

October 20, 2021

व्हॉट्सअ‍ॅपवरून मुलींचे फोटो पाठवून सुरु होता वेश्याव्यवसाय ; पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

February 20, 2022

कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवं, ‘निरर्थक बात’ची गरज नाही ; राहुल गांधींची टीका

May 30, 2021

जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबविण्यात यावे‌ : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

August 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group