भुसावळ (डॉ. नि. तु.पाटील) कोरोना महामारी आणि सतत होणारी संचारबंदी यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच घरातील कोणाला कोरोना संक्रमण झाले तर मग सर्व घरदार त्याभोवती फिरत राहते. त्यामुळे जी काही बचत असते ती पण खर्च होते.
रुग्ण पहिल्या पायरीवर असल्यास लवकर बरा होतो, पण कोरोना संक्रमण जास्त वाढल्यास रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये सर्व सुखसोयी युक्त रुग्णालयात भरती करावे लागते. त्यासाठी नातेवाईकांना रुग्णवाहिका करून रुग्णाला इतरत्र हलवावे लागते. त्यात आता महाराष्ट्र शासनाने रुग्णवाहिका चालकांचे मनमानी दाराला चाफ बसवला आहे. (तक्ता सोबत कंमेंट जोडला आहे), त्यामुळे नातेवाईकांना थोडासा का होईना आर्थिक धीर मिळाला.
आता, रुग्णवाहिका चालकांसाठी पण खुश खबर आहे. रिलायन्स बी. पी.मोबिलिटी कंपनीने आपले सामाजिक भान जोपासत, दि. १८ मे २०२१ ला कोरोनाकाळात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या नोंदणीकृत रुग्णवाहिकेचा दररोज ५० लिटरपर्यंत इंधन मोफत मिळणार आहे. अशी घोषणा केली आहे. यासाठी फक्त एक फॉर्म भरून द्यायचा आहे (सोबत कंमेंट जोडला आहे),रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीने रुग्णवाहिका चालकांना हा फार मोठा दिलासा दिला आहे. भारतातील जवळपास १४२१ या रिलायन्स पेट्रोल पंपवार दररोज ५० लिटरपर्यंत इंधन मोफत मिळणार आहे. ही योजना दि. ३० जुन २०२१ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत रुग्णवाहिका चालकांनी रीतसर रिलायन्स पेट्रोल पंपवार फॉर्म भरून रुग्णसेवा सुरू ठेवावी, ही नम्र विनंती…!
रिलायन्स समुह चमू बद्दल मला सांगावसे वाटतं,
“बडे सें बडा बिजनेस पैसो सें नहीं होता,
एक बडे आयडिया सें बडा होता है…!
डॉ. नि. तु.पाटील
उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,
वैद्यकीय आघाडी,भारतीय जनता पार्टी ,
महाराष्ट्र राज्य
मो.8055595999
दि. 29/05/2021