मुंबई (वृत्तसंस्था) टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी ६ जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
रिपब्लिकच्या ४ वरिष्ठ पदावरील व्यक्तींना हे समन्स जारी करण्यात आले आहेत. यात हंसा रिसर्च ग्रुपच्या दोघांना गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा आज शनिवारी आणखी ६ जणांची चौकशी करणार आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार विकास खानचंदानी आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानी चौकशीसाठी दाखल झाले आहे.
विकास खानचंदानी (सीईओ रिपब्लिक), हर्ष भंडारी (सीओओ रिपब्लिक), प्रिया मुखर्जी (सीओओ रिपब्लिक) आणि घनश्याम सिंग (डिस्ट्रीब्युशन हेड ऑफ रिपब्लिक) यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.