जळगाव (प्रतिनिधी) महिला आघाडी शिक्षक भारती संघटनेच्या जिल्ह्यातील महिलांची जिल्हा कार्यकारिणी महिला आघाडीच्या महिलाध्यक्षा शितल संजय जडे व जिल्हाअध्यक्ष नारायण वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निवड जाहीर करण्यात आली. प्रतिभा रुपेशकुमार पाटील सचिव, सुनिता पद्माकर पाटील कार्याध्यक्ष, वर्षा अहिरराव कार्यवाह, भारती तुकाराम ठाकरे कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.
आदर्श विचार परंपरा निर्माण करणारी संघटना माणसाचा शोषणाविरुद्धचा लढा अधिक मजबूत करून स्वातंत्र्य, समता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी झटणारी शिक्षक भारती संघटना शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी लढा देण्यासाठी नेहमीच सक्रीय असणारी संघटना आहे. या संघटनेत मला कार्याध्यक्ष महिला आघाडी शिक्षक भारती जळगाव येथे काम करण्याची संधी मिळाली ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. शिक्षक महिला भगिनीचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत माझा सक्रीय सहभाग असेल असे मत कार्याध्यक्ष सुनिता पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केले. शिक्षक भारती ही संघटना शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी या ब्रिद घेवून काम करणारी संघटना आहे. या संघटनेत माझी महिला आघाडी शिक्षक भारती जळगाव जिल्ह्यावर सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. सर्वप्रथम संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. कारण मला या संघटनेत एक जबाबदार घटक म्हणून समाविष्ट केले आहे. काम करीत असताना शिक्षक भारतीचा प्रसार तसेच महिला शिक्षिकांचे संगठन व समस्या इ. गोष्टींसाठी मी सदैव प्रयल शील राहील असे मत प्रतिभा रुपेश कुमार पाटिल-जिल्हा सचिव यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांनी नुतन महिला पदाधिकारींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.