जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठान व जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने आरटीओ टेस्टिंग ट्रॅकच्या दुतर्फा वड, पिंपळ, करंज बकुळ, कडुलिंबची पाच ते सहा फुटाची १०१ रोपे लावण्याच्या प्रकल्पाला जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या हस्ते बकुळाचे रोप लावून शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील अँड. केतन ढाके, निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, उद्योजक किरण कासार, मुकेश टेकवाणी व परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान सर्व झाडांना पिंजरे लावण्यात येणार आहे. या सर्व रोपांची मराठी प्रतिष्ठान देखभाल व संवर्धन करणार आहे. या प्रसंगी मराठी प्रतिष्ठाणचे सचिव विजय वाणी यांनी वृक्षारोपण प्रकल्पा बाबत सविस्तर माहिती दिली. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे, संदीप मांडोळे उपस्थित होते.
















